कायनेटिक ग्रीनकडून प्रतिचार्ज १२५ किमीची दर्जात्मक रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ‘झिंग हाय-स्पीड’ लॉन्च…


Pune- ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)
कायनेटिक ग्रीनकडून प्रतिचार्ज १२५ किमीची दर्जात्मक रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ‘झिंग हाय-स्पीड’ लॉन्च
नवीन मॉडेल्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकी विभागामध्ये आपली उपस्थिती अधिक वाढवण्याची योजना
पुणे, 13 सप्टेंबर २०२२: कायनेटिक ग्रीन एनर्जी अॅण्ड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्सच्या अग्रणी उत्पादक कंपनीने आज इलेक्ट्रिक दुचाकी ‘झिंग हाय-स्पीड स्कूटर’ (‘झिंग एचएसएस’) लॉन्च केली.
झिंग एचएसएस ही लाइफस्टाइल स्टेटमेंट आहे, जी आधुनिक काळातील राइडरकडून प्रेरणा घेते. या स्कूटरमध्ये मल्टी स्पीड मोड, पार्ट फेलर इंडिकेटर यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत आणि प्रतिचार्ज १२५ किमीची रेंज देते. या स्कूटरची आकर्षक स्टायलिंग, तंत्रज्ञान व राइडिंग अनुभव ग्राहकांना अद्वितीय अनुभव देतात. प्रतितास ६० किमीच्या अव्वल गतीसह वेईकल उत्तमरित्या चाचणी करण्यात आली आहे आणि ग्राहकांना सुरक्षिततेची खात्री देते. या वेईकलमधील प्रगत बॅटऱ्या, ३-स्टेप अॅडजस्टेबल सस्पेंशन व रि-जनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम सुलभ व आरामदायी राइडची खात्री देतात.
झिंग एचएसएसमध्ये ३.४ केडब्ल्यूएच अॅडवान्स्ड लिथियम-आयन बॅटरी आहे, जी प्रतिचार्ज १२५ किमीची रेंज देते. ज्यामुळे ही स्कूटर अत्यंत सोईस्कर असण्यासोबत अंतराबाबत चिंता न करण्याची खात्री देते.
झिंग एचएसएस कायनेटिकचा विश्वास व वॉरंटीसह येते. कायनेटिक ग्रीन ग्राहकांसाठी त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी सर्वात किफायतशीर करण्यासाठी श्रीराम सिटी युनियन, आयडीएफसी फर्स्ट बँक, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस, इंड्सइंड बँक यांसारख्या सहयोगींच्या माध्यमातून सर्वात आकर्षक फायनान्स योजना देखील देईल
. झिंग एचएसएस ग्राहकांसाठी फेम सब्सिडीसह ८५,००० रूपये या एक्स-शोरूम आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध असेल.
याप्रसंगी बोलातना कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, ‘’झिंग इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चमधून जागतिक दर्जाचे ईव्ही तंत्रज्ञान देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. मला १२५ किमीची दर्जात्मक रेंज व सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त हे मॉडेल लॉन्च करण्याचा अभिमान वाटतो.
कंपनीची हाय-स्पीड स्कूटर्समध्ये विविध ऑफरिंग्जसह पोर्टफोलिओ विस्तारित करण्याची अग्रणी योजना आहे आणि आमची क्रांतिकारी ई-लुना २०२२-२०२३ साठी सज्ज आहे. कायनेटिक ग्रुपला कायनेटिक लुना व कायनेटिक होंडा स्कूटर सारख्या प्रगत, पण किफायतशीर दुचाकी विकसित करण्यामध्ये, तसेच दुचाकी क्षेत्रामध्ये व्यापक अनुभव आहे.
कायनेटिक ग्रुप आगामी वर्षांत इलेक्ट्रिक दुचाकी विभागामध्ये अद्वितीय उत्साह निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहे. ब्रॅण्डचा भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी विभागामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे.’’
इलेक्ट्रिक तीन-चाकीमधील यशानंतर भारतातील इलेक्ट्रिक वेईकल विभागामधील अग्रणी कायनेटिक ग्रुपने २०२१ मध्ये यशस्वीरित्या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये प्रवेश केला.
कंपनीने २०२१ मध्ये २ मॉडेल्स लॉन्च केले आणि आतापर्यंत ३०,००० हून अधिक स्कूटर्सची विक्री केली आहे. गणेश चतुर्थी व ओणमसह सणासुदीच्या काळाला सुरूवात करत झिंग हाय स्पीड स्कूटर भारतातील ३०० हून अधिक एक्सक्लुसिव्ह कायनेटिक ग्रीन डीलर्सच्या माध्यमातून ३१ ऑगस्टपासून उपलब्ध असेल.