पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना रुजू करण्यास राजकीय दबावाखातर आयुक्त शेखर सिंह यांची टाळाटाळ


पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना रुजू करण्यास राजकीय दबावाखातर आयुक्त शेखर सिंह यांची टाळाटाळ
पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.विकास ढाकणे यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या सौ स्मिता झगडे यांना प्रमोशन मिळाले असून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची निवड झाली असून सौ स्मिता झगडे या पिंपरी महानगरपालिकेत येऊनही राजकीय दबावाखातर,एका स्थानिक आमदाराच्या विरोधामुळे रुजू न करण्यासाठी आयुक्तानावर मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव असल्याची चर्चा सुरु आहें
. त्यामुळे आजचा पदभार टळला असल्याची चर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरू होती तसेच पालीकेतील काही शासनाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन आमच्या पेक्षा स्मिता झगडे या ज्युनियर अधिकारी आहेत. त्यामुळे आम्ही त्त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय
मुख्यमंत्री कार्यालयातून या अधिकाऱ्याच्या बदल्या होत असतात त्यामुळे आयुक्तानी थेट मुख्यमंत्र्याच्या आदेशालाचं केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा पालिकेत दबक्या आवाजात सुरु होती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या बदली नंतर अतिरिक्त आयुक्त श्री विकास ढाकणे यांची बदली झाली व त्यांच्या जागेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या सौ स्मिता झगडे यांची निवड झाल्याची बातमी पालिकेत धडकली.सौ स्मिता झगडे या सकाळी चं महानगरपालिकेत रुजू होण्यासाठी दाखल झाल्या मात्र शहरातील एका स्थानिक आमदाराच्या विरोधामुळे सौ स्मिता झगडे या पदभार न घेताच पालिकेच्या बाहेर पडल्या असल्याची चर्चा पिंपरी महापालिकेच्या आवारात अधिकारी ,कर्मचारी वर्गात सुरू होती.
पिंपरी चिंचवड शहरांत आयुक्त शेखर सिंह यांनी राजकीय दबावाखातर अश्या प्रकारे अधिकाऱ्यावर. अन्याय करणे प्रशासकीय दृष्ट्या चुकीचे ठरेल