महाराष्ट्रातील दोन लाख सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताचे काम राज्यकर्त्यांनी हिसकावले – अजित पवार

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -). अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्रामचा कार्यक्रम औरंगाबाद, मुंबई येथे न घेता हैद्राबाद येथे घेतला जात आहे. राज्यकर्त्यांनी मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन, स्मरण करणे गरजेचे असुन सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात आहे

शेतक-यांच्या विमा प्रश्नावरही शासनाचे दुर्लक्ष असुन विमा कंपनी क्लिष्ट निर्माण करत आहे. काही भागातील शेतक-यांच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. शेतक-यांचे नुकसान झालेले असुन शेतक-यांना पिकविमा, आर्थिक मदत झाली पाहिजे. इतर राज्यामध्ये हजारो जनावरे आजारी असुन राज्यामध्ये लम्पी संसर्ग रोखण्यासाठी तातडीने लसिकरण करावे,

लस उपलब्ध होत नसेल तर परदेशातून मागवावी वेदांता प्रकल्पासाठी तळेगावची (जि. पुणे) जागा उपयुक्त होती. कुशल मनुष्यबळ असतांनाही हा प्रकल्प गुजरात राज्यामध्ये हलविल्यानेमहाराष्ट्रातील दोन लाख सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताचे काम राज्यकर्त्यांनी हिसकावुन घेतल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी केला

. वेदांता गुजरातला हलविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा असून हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोप करत आम्ही सत्तेत असतो तर हा प्रकल्प इतरत्र हलवू दिला नसता असा दावाही पवार यांनी केला.बेरोजगारी, महागाई यावर न बोलता इतर गोष्टीवर लक्ष दिले जात आहे.

वेदांता, फॉक्सन हे दोन्ही प्रकल्प गुजरातला गेले कसे हे जनतेलाही माहिती असुन या दोन्ही प्रकल्पातुन राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. यामुळे राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा समोर येत आहे.राज्यातील सरकार स्थगिती सरकार आहे.

राज्यामध्ये सरकार स्थापन होवून तीन महिण्याचा कालावधी उलटला आहे. तरी देखिल पालकमंत्री नेमले नाहीत. परिणामी अनेक कामे रखडली आहेत. सरकारे येतात जातात परंतु सध्या ज्याप्रकारे प्रत्येक गोष्टीला स्थगिती मिळत आहे, त्यावरून राज्यातील सरकार स्थगिती सरकार असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

Latest News