जिवो जिवस्य जीवनम्’ माहितीपटालाइंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड


‘जिवो जिवस्य जीवनम्’ माहितीपटाला
इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड
पुणे :
पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी, युवा दिग्दर्शक सिध्दार्थ बाळकृष्ण दामले याच्या ‘जिवो जिवस्य जीवनम् ‘ या माहितीपटाला अकराव्या इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड मिळाले आहे.हा फेस्टिव्हल भोपाळ येथे झाला.
परसबागेतील बुलबुल पक्ष्याच्या जोडी कडून घरट्याची निर्मिती, त्यावर बहिरी ससाण्याचा हल्ला, उरलेल्या अंडयातून होणारे प्रजनन , पुढे जाणारे जीवन आणि यातून निसर्गाचा दिला जाणारा संदेश, हा या माहितीपटाचा विषय आहे.रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर चे सदस्य डॉ. बाळकृष्ण दामले यांची निर्मिती असून मोहिनी दामले, मिलिंद पाटील यांनी माहितीपटासाठी संशोधन केले. राजश्री गोखले यांनी निवेदन केले असून तांत्रिक बाजू वासिम पठाण यांनी सांभाळली आहे.
