रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी ”चंद्रकांता सोनकांबळे” यांची निवड…

पिंपरी :. विधानसभा मतदारसंघात २०१४ ला सोनकांबळे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नावाने विक्रमी मतदान घेतले होतेचंद्रकांता सोनकांबळे ) यांची रिपब्लिकन पार्टीच्या (RPI) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा राष्ट्रीय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच केली

सोनकांबळे यांचे वडील दिवंगत एल. एस. सोनकांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते माजी खासदार ऍड बी. सी. कांबळे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले. तसेच 1992 मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. चंद्रकांता सोनकांबळे यांच्या निवडीने पुण्याला आणि पिंपरी-चिंचवड शहराला महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे

राज्यातील महिलांवरील अन्याय अत्याचार तसेच महिलांच्या विविध प्रश्नासाठी मोठा लढा उभारून रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाने महिलांना न्याय देण्याच काम करणार. तसेच महीला सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले आहे

.चंद्रकांता सोनकांबळे या तब्बल पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या विविध प्रमुख जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. सोनकांबळे यांनी याअगोदर महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे.

.

Latest News