लक्ष्य’ नृत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद,भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


‘ लक्ष्य’ नृत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम*
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित
शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था निर्मित ‘ लक्ष्य ‘ या नृत्य कार्यक्रमाला शनीवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला
शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था निर्मित या कार्यक्रमात गौरेश शेटकर ( कथक ), विकीराज कडले ( भरतनाट्यम् ), कृष्णेंदू साहा (ओडिसी ) यांनी एकल नृत्यसादरीकरण केले.
.या कार्यक्रमाचे आयोजन शनीवार, १७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नृत्यगुरु सुचेता चापेकर , नृत्य गुरू अनिता शर्मा, भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
विकीराज कडले यांनी भरतनाट्यम् चे उत्तम सादरीकरण केले. अर्धनारेश्वरकृती, अभिनय आणि तिल्लाना या नृत्य प्रस्तुती सादर केल्या. गौरेश शेटकर यांनी कथक नृत्य रचनामध्ये शिवस्तुती, ताल धमार मध्ये कथक च्या पारंपारिक रचना सादर केल्या. अभिनय प्रकारात द्रौपदी वस्त्रहरण सादर करून रसिकांची मने जिंकली.
उदयपूर चे ओडीसी नृत्यकलाकार कृष्णेंदू साहा यांनी अप्रतिम सादरीकरण केले.पारंपारिक ओडिसी रचना रंगपूजा, दशावतार आणि मोक्षमंगलम या रचना सादर केल्या.
ज्येष्ठ नृत्यगुरु सुचेता चापेकर , नृत्य गुरू अनिता शर्मा, भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १३९ वा कार्यक्रम होता.