मुख्यमंत्री असताना मी गुजराती समाजाला 2% टक्के आरक्षण दिले….

सोलापूर :. महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरात भारत गौरव पुरस्कार देऊ गौरविण्यात आले. त्या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना झालेली निवडणूक आणि ती जिंकूनही पदावरून हटविल्याची खंत व्यक्त केली म्हणाले की, मुख्यमंत्री असताना मी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी गुजराती समाजासाठी केले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केले.

एका गुजराती साधूंनी मला बोलावून घेऊन आशीर्वाद दिला होता. गुजराती समाजाला आरक्षण दिले, कारण माझा जावईच गुजराती असल्यामुळे मला ते त्यावेळी करावे लागले होते. जावयाला सांभाळायचं म्हणजे हे सर्व करावं लागतं (त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला). त्यावेळी तशी परिस्थितीच होती, ते मला करावं लागलं होतं मुख्यमंत्री असताना मी हे सगळं केल्यामुळेच मी महाराष्ट्रात परत निवडणुका जिंकून आलो होतो.

त्यावेळी निवडणुका जिंकणं साधी गोष्ट नव्हती. मात्र, (व्यासपीठाकडे बोट दाखवत) यांना माहिती आहे, आतले कारस्थान. कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठविलं. पण ठीक आहे. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रीमंडळात गेलो. ज्या लोकांनी मला आंध्रला पाठवलं. ‘त्यांना’ जो पराभव पत्करावा लागला, तो अजूनपर्यंत आहे. असं होतं. पण आपण आपलं काम प्रामाणिकपणं करत राहिलं पाहिजे

, या शब्दांत शिंदे यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर निशाणा साधला.काँग्रेस पक्षातील लोकांनी कट कारस्थान करून त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदावरुन काढलं आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठविले. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

Latest News