देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे : बाळासाहेब आंबेडकर

पुणे :. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली

देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे,

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे, महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. 

Latest News