कमळाबाईचा आणि मुंबईचा सबंध काय? – उद्धव ठाकरे


मुंबई-( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- संकटात असते तेव्हा ही गिधाडे कुठे असतात. मुंबई जमीन नाही, ही आमची मातृभूमी आहे. जो आमच्या अंगावर येईल त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही. आईला गिळायला निघालेली आवलाद आहे. दसरा मेळावा येतोच आहे, तेव्हा बोलणार आहेच.आज मुंबईवरती बोलणार आहे. कमळाबाईचा आणि मुंबईचा सबंध काय आहे, असा सवाल केला. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा आहे. मुंबईवर हक्क सांगू नका. वंशवाद कसाल वंशवाद, मला माझ्या वंशाचा अभिमान आहे, मुंबईच्या लढ्यात माझे आजोबा होते. जनसंघाने समिती फोटली, ही त्यांची ओलाद. जनसंघ त्यातून बाहेर पडला.
मुंबई : आज ते एवढ आहे, दसऱ्याला किती असले, दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थवरच होणार. रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत यांची मिंदे सगळे तीकडे गेले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) मोडेल पण वाकणार नाही, या निच्छयाने लढत आहेत. दुसरे बघितले, आमचे वडील जागेवर आहेत ना, शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी त्यांनी शिंदे गट, भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईवर आता गिधाडांची औलाद फिरायला लागली आहे. मुंबईचा लचका तोडण्यासाठी फिरत आहेत. स्वराज्यावरती अनेकजण चालून आले होते. त्यातील आता अमित शहा, देशाचे गृहमंत्री. मुंबईत काय बोलले,जमीन दाखवा. तुम्ही जमीन दाखवाच तुम्हाला आसमान दाखवल्या शिवाय राहणार नाही
आमची २५ वर्ष युतीमध्ये सडली. ही सगळी नालायक लोक आपण जिंकली. काही नसताना यांना पदे दिली. मराठी माणसासाठी तुमचा वशं कोणता, बावनकुळे की १५२ कुळे, असा टोला लगावला. ७० वर्षानंतर चित्ता आणला. काय जाहिराती सुरु होत्या. दार उघडल्यावर चित्ता करतो मॅव, असा चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काढला.