नेहा कक्कर तू आणखी किती खालच्या पातळीला उतरणार?-फाल्गुनी पाठक


मुंबई 🙁 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )
– मैंने पायल है छनकाई’ हे गाणे फाल्गुनी पाठक यांनी गायिले होते. आता या गाण्याचा रिमेक पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. १९ सप्टेंबर रोजी नेहाने ‘ओ सजना’ हे गाणे प्रदर्शित केले. या गाण्यात नेहासोबत क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्याला तनिष्क बागचीने म्यूझिक दिले आहे
. पण हे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत नसल्याचे दिसत आहे.फाल्गुनी पाठक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी, ‘नेहा कक्कर तू आणखी किती खालच्या पातळीला उतरणार आहे? आमच्या जुन्या क्लासिक गाण्यांची वाट लावणे बंद कर’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे
एका यूजरने ‘ओल्ड इज गोल्ड, फाल्गुनी पाठकला कोणीही रिप्लेस करु शकत नाही’ असे म्हटले आहे
. तर दुसऱ्या एका यूजरने ‘माझ्या कानातून रक्त आले, किडनीला स्पर्श करणारे गाणे आहे’ असे म्हणत नेहाला सुनावले आहे. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका म्हणजे नेहा कक्कर. तिच्या गाण्यांनी तर तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. पण सध्या सोशल मीडियावर नेहा कक्करवर टीका केली जात आहे. ही टीका नेहाने ९०च्या दशकातील अतिशय हिट गाणे ‘मैंने पायल है छनकाई’ रिमेक केल्यामुळे होत आहेत. गायिका फाल्गुनी पाठकने देखील नेहाला चांगलेच सुनावले आहे