शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रें विरोधात राज्यभरातल्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणार….


मुंबई : (. ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -)राष्ट्रवादी काँग्रेस म्हात्रेंविरोधात राज्यभरातल्या पोलिस स्ठानकात गुन्हे दाखल करणार आहे. तर दुसरीकडे पोलिस त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याने, म्हात्रे यांच्या समोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. या वादावर म्हात्रे म्हणाल्या की, सुळे यांचा तो फोटो समाज माध्यमात व्हायरल होत होता, म्हणून माझ्याकडून तो फोटो ट्वीटकेला गेला.
मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो समाज माध्यमात व्हायरल केला गेला. या फोटोसाबत लिहलेला मजकूर मॉर्फ आहेयामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही अवमान झाला
. राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्याची प्रतिमा मलीन केली, अशी त्यांनी प्रतिक्रीया दिली होती. म्हात्रे यांनी याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरबाबत आपली भूमिका सांगितली. “माझ्यावर राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार दाखल झाली आहे, यावर वकीलांचा सल्ला घेऊन आम्ही कायदेशीर उत्तर देणार, असं त्या म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला मॉर्फ फोटो शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी ट्वीट केला होता. यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती
. आता म्हात्रे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे माहिती मिळत आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रविकांत वरपे यांनी सुळे यांचे मॉर्फ फोटे ट्वीट केल्यामुळे म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
वरपे ट्वीट करत म्हणाले की, “आमच्या नेत्या आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांचे फोटो मॉर्फिंग करून, ते ऑनलाईन पद्धतीने प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा गुन्हा मिंध्ये सेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आता शीतल म्हात्रे गोईंग टू जेल! चक्की पिसींग, चक्की पिसींग और चक्की पिसींग.”