मी पुण्याचा पालकमंत्री असताना वेळ देताना नाकीनऊ. फडणवीसांकडे सहा-सहा जिल्हे दिले

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ). देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कसे काय सोपविण्यात आले, याबाबत अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना वेळ देताना नाकीनऊ येत होते. आठवड्यातील एक दिवस मला पुण्याला द्यावाच लागायचा.

सकाळी साडेसात सातला सर्किट हाऊसला बसून कामाचा निपटरा करायचो. कामाचा व्याप मोठा असतो. फडणवीसांकडे तर सहा सहा जिल्हे देण्यात आले आहेत. ते कसं पेलवणार आहेत. काय होणार आहे, मला माहिती नाही. पण त्यांना माझ्या शुभेच्छा, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले

सरकारकडून पालकमंत्रीजाहीर करण्यात आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. काही मंत्र्यांकडे एका जिल्ह्याचे पालकमंत्रीपद, काहींकडे दोन जिल्हे दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. मी पुण्याचा पालकमंत्री असताना वेळ देताना नाकीनऊ येत होते. फडणवीसांकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत. ते कसं पेलवणार आहेत. काय होणार आहे, मला माहिती नाही. पण त्यांना शुभेच्छा, अशा शब्दांत पालकमंत्री नेमणुकीबाबत अजित पवारयांनी भाष्य केले.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अजित पवार यांनी आज (ता. २५ सप्टेंबर) पालकमंत्री आणि जिल्ह्यांचा मुद्दा छेडला. हे सरकार सत्तेवर कसे आले, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. गद्दारी केली की प्रलोभने दाखवली, हे त्यांचे त्यांनाच माहिती. सरकारकडून आता पालकमंत्रीही नेमण्यात आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पालकमंत्रीपद म्हणजे कामाचा प्रचंड व्याप असतो. पण, आता लोकांची कामे होणे गरजेचे आहे

अनेक समित्या असतात. त्यांचे काम करावे लागते. अनेक कामांच्याबाबत निर्णय घ्यावे लागतात. सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस कसा काय वेळ देतील, असे सांगून अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र असे असले तरी त्यांना शुभेच्छा, या शब्दांत फडणवीसांनाही पवारांनी शुभेच्छाही दिल्या

बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना ते म्हणाले की, नोकरीला लागल्यानंतर पालक आपल्या नातेवाईकांना पुन्हा बारामतीत बदली करण्यासाठी आग्रह करतात. पण, महाराष्ट्रात कुठेही काम करणे गरजेचे आहे. मला काटेवाडीवरून मुंबईला बारामतीरांनी पाठवले. मी थोडाच परत आलो किंवा मला बारामतीलाच यायचं अस म्हणालो. केलंच ना मीही काम, असे म्हणतानाच मीदेखील काटेवाडीला येतो, माझ्या आईला भेटतो. मात्र, मी या भेटीचा फोटो काढत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

Latest News