ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला गटातर्फे’ नृत्य समिधा’ कार्यक्रमाचे आयोजन

*पुणे :ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे ‘ नृत्य समिधा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात होणार आहे. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. स्वाती दैठणकर , सुवर्णा गोखले यांच्या उपस्थितीत ”शेडस् ऑफ वूमनहूड ‘ या माहितीपट-मालिकेचे यू ट्यूब वर प्रकाशन होणार आहे.या मालिके च्या पहिल्या टप्प्यामध्ये ‘भरतनाट्यम’ नृत्य माध्यमातून स्त्रीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.’वेदांमधील स्त्रिया, कला व आनंद ‘ या विषयावर डॉ.सुचेता परांजपे संवाद साधणार आहेत. माहितीपट मालिकेचा रसास्वाद डॉ. स्वाती दैठणकर करणार आहेत. ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले या ग्रामीण भागातील स्त्री सशक्तीकरणाबद्दल विचार मांडणार आहेत.ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला गटातर्फे डॉ. वैदेही केळकर, मिलिंद संत यांनी ही माहिती दिली .प्रवेश विनामुल्य असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे……… .

Latest News