भवानी माता मंदिराजवळील व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगाराना गुन्हे शाखा,युनिट एक कडून जेरबंद


भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद
पुणे (परिवर्तनाचा सामना ). शहरात खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर मालमत्तेविरुध्द गुन्हे घडु नये त्यास प्रतिबंध करून फायदा य या राखणेकरिता व जनतेचे मालमत्तेचे नुकसान होवु नये म्हणुन हददीत प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारांना जेरबंद करण्याकरीता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख याना बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, काही लोक त्रिकोणे गार्डन, भवानीपेठ, पुणे येथे संध्याकाळी एकत्र येणार असून ते कोठे कारी दरोडा टाकण्याची तयारी करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली
युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे बातमीच्या ठिकाणी येवुन सापळा लावला असता त्रिकोणीगार्डन कडून शंकरशेठ रोकडे जाणा-या अंतर्गत रोडवर मिरा पुढे भवानीपेठ पुणे येथे संशयीतरित्या एकत्र जमुन आपसात चर्चा करीत असताना काही इसम दिसले बातमी खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे एकुण पाच लोक मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले
१) आमान समीर शेख वय २२ वर्ष राकाशवाडी भवानीपेठ चमनशाह दर्ग्याजवळ, ) अमीर समीर शेख वय २० वर्ष रा काशेवाडी भवानीपेठ, चमनशाह दर्ग्याजवळ, पुणे, क्र. ३) अमोल अनिल अंबवने वय २० वर्ष रा काशेवाडी भवानीपेठ, चमनशाह दर्ग्याजवळ पुणे क्र. ४) शारूख दाऊद सय्यद वय २६ वर्ष रा भाग्योदयनगर, गल्ली नं ७, कोंढवारपुर्द पुणे क्र. ५) सादीक अमीर शेख वय २५ वर्ष रा काशेवाडी भवानी
पेठ, चमनशाह दर्ग्याजवळ, पुणे असे असल्याच सांगितली त्यांच्या झडती घेत्ता २ कोयते, नॉयलॉन दोरी, मिरची पुड, लांकडी दांडके अशी घातक हत्यारे जप्त कसन त्याना जेरबंद केले.
सदर आरोपी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न घरफोडी, मारामारी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत नमुद आरोपीकडे अधिक तपास करता भवानी माता मंदिराजवळील एक व्यापारी रात्रीचे वेळी त्याचे दुकानातील कॅश घेवून या रोडने जात असतो व त्याचेजवळ पद्यातील मोठी कॅश असते त्यास लुटण्याचे तयारीत सदर ठिकाणी एकत्र जगलो असल्याचे सांगीतले
आरोपी विरुद्ध खडक पोलीस ठाणेत गुन्हा नोंद क्रमांक- २९२/२०२२ भादवि कलम ३९९.४०२ भारताचा हत्यारा बाबतचा कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहामो निरीक्षक श्री आशिष कवठेकर युनिट- गुन्हे शाखा हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले सहायों-निरीक्षक आशिष कवठेकर, पोउप-निरीक्षक सुनिल कुलकणी अजय जाधव, पोलीस अमलदार अमोल पवार, इम्रान शेख अजय थोरात अय्याज दडीकर, विठ्ठल साळुंखे, महेश बामगुडे निलेश साबळे यांनी केली आहे,