पावसाचे भाकीत खरे ठरले: ज्योतिष तज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा…..एक वर्षापूर्वीच वर्तवले होते भविष्य


पावसाचे भाकीत खरे ठरले: ज्योतिष तज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा
…………………..
एक वर्षापूर्वीच वर्तवले होते भविष्य
पुणे:
2022 या वर्षांमध्ये किती पाऊस पडेल याविषयीचे भाकीत एक वर्ष आधी केलेले असताना ते जसेच्या तसे खरे ठरल्याचा दावा ज्योतिष तज्ञ आणि ज्योतिष ज्ञान या दिवाळी अंकाचे संपादक सिद्धेश्वर मारटकर यांनी केला आहे. आज दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी हा दावा केला.
पर्जन्यमान 2022 सुरवाती पासून शेवटच्या परतीच्या पावसापर्यंतचे संपूर्ण भाकीत अचूक ठरले आहे.
महाराष्ट्रात सरासरीच्या 23% पाऊस जास्त झाला आहे.सरासरी पेक्षा अधिक पाऊस होईल असे भाकीत मागील वर्षीच्या ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकातून म्हणजे वर्षभर आधीच वर्तविण्यात आले होते.
मागील वर्षातील ( २०२१ ) दिवाळी अंकातून वर्तविलेली या प्रकारची अनेक राजकीय, सामाजिक व नैसर्गिक भाकिते खरी ठरली आहे.त्या पैकी महाराष्ट्रातील सत्ता बदलाचे भाकीत सुद्धा ज्योतिष ज्ञान च्या जानेवारीच्या अंकातून अगोदरच वर्तविण्यात आले होते, असे मारटकर यांनी सांगितले.
कसे वर्तवले जाते भाकीत ?
आगामी भविष्य जाणून घेण्याच्या अनेक पद्धती ज्योतिष शास्त्रात आहेत. ज्योतिष शास्त्राच्या अनेक शाखा देखील आहेत .मेदिनीय ज्योतिष शास्त्राच्या आधारे पावसाचे भाकीत वर्तवले जाते. दाते पंचांग आणि ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकात मारटकर यांचे हे पर्जन्यमानाविषयीचे भाकीत प्रसिद्ध होते. पंचांग आणि दिवाळी अंक एक वर्ष आधी प्रसिद्ध होत असल्यामुळे आगामी वर्षाचे पर्जन्यमान आपल्याला आधीच कळून जाते.सामाजिक राजकीय व नैसर्गिक भाकिते देखील वर्तविली जातात, असे मारटकर यांनी सांगितले