सब युनिटी असोसिएशन (AOP) ची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व यशस्वी पणे संपन्न.


*सब युनिटी असोसिएशन (AOP) ची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व यशस्वी पणे संपन्न.
*स्पार्क रियालिटी कंपनी, पुणे च्या स्पार्क अर्बन ब्लीस हाउसिंग प्रोजेक्ट, वाडे बोल्हाई ता. हवेली जि. पुणे येथील बऱ्याच वर्षापासून बंद पडलेल्या, गृह निर्माण प्रोजेक्टच्या फ्लॅट धारक सभासदानी एकत्र येऊन स्थापित केलेल्या *सब युनिटी असोसिएशन* च्या सभासदांची *प्रथम वार्षिक सर्व साधारण सभा,* रविवार दि. 18 सप्टेम्बर 2022 ला अहमदनगर येथील *”हॉटेल पटियाला हाउस*”, नगर -मनमाड रोड येथे उत्साह पुर्ण वातावरणात यशस्वी संपन्न झाली.
आमसभे मध्ये महाराष्ट्राचे विविध भागातुन आलेले सर्व महिला व पुरुष फ्लॅट धारक सभासद उपस्थित होते. आमसभेमध्ये आलेल्या सर्व उपस्थितांचे स्वागत असोशीएशन चे अध्यक्ष श्री. संजीवजी घोलप यांनी केले. उपस्थित मान्यवर सभासदांचे शुभ हस्ते श्री गणेश पुजन व दीप प्रज्वलन करुन आमसभेची सुरुवात झाली. त्यानंतर मागील काळातील दिवंगत सभासद व इतर महत्वपुर्ण व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आमसभेचे प्रास्ताविक व असोसिएशन च्या स्थापने पासुन आजपर्यंत केलेल्या उल्लेखपूर्ण घडामोडीचा सम्पुर्ण अहवाल असोसिएशनचे सचिव श्री. गोविंद खत्री यांनी उपस्थित सभासदाना समोर प्रस्तुत केला. असोसिएशन चे सचिव डॉ. नितिन सायंबर यांनी महारेरा मध्ये दाखल केस ची सम्पुर्ण माहिती, व बंद अवस्थेत असलेला प्रोजेक्ट पुर्ण करण्या साठी उपलब्ध सर्व पर्याय याची माहिती तसेच श्री गावडे यांची रखडलेला प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी याबद्दल विस्तृत माहिती उपस्थित सभासदांना सांगितली
. *जे फ्लॅट धारक अजुनही सब युनिटी असोसिएशन चे सभासद झालेले नाही, त्यांनी असोसिएशन चे सचिवांशी संपर्क करुन रीतसर फॉर्म व शुल्क भरून त्वरीत सभासद बनण्याचे आवाहन डॉ सायंबर यांनी केले.*
या प्रसंगी असोसिएशन चे डायरेक्टर श्री मुकेश जैन यांनी आपले विचार मांडुन सर्व सभासदाना संपूर्ण ताकदीने प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी तन मन धनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. असोसिएशन चे उपाध्यक्ष एडवोकेट अनिल हिरुळकर यांनी प्रोजेक्ट च्या कायदेशीर बाबींवर सभासदाना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. असोसिएशन च्या आर्किटेक्ट सुश्री योगिता जुन्दरे मैडम यांनी तयार केलेला सम्पुर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट सभागृहात सादर केला.
दुपारच्या सत्रा मध्ये असोसिएशन च्या सर्व सभासदानी आर्थिक अहवालासह इतर काही महत्वपुर्ण ठराव एकमताने पास केले. शेवटी उपस्थित सभासदा मधून सौ. सलुजा मैडम, सौ. सुर्यवंशी मैडम, श्री. मुलानी सर यांनी आपल्या प्रतिक्रया व्यक्त करुन असोसिएशन आजपर्यंत केलेल्या सर्व कामा बद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले. आमसभेला उपस्थित सर्व सभासदांचे आभार प्रदर्शन श्री सोहेल खान सर यांनी केले.