तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच….


मुंबई ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता, असं म्हणत शिवसेनेनं सामनातून भाजपला आव्हान दिलं आहेदरम्यान, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. खोकेवाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या मैदानावर धर्म आहे. त्यामुळे जय नक्की आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.मुंबई आम्हीच जिंकणार, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहणार, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.आज शिवतीर्थावर विचारांचं सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचं राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच, असं शिवसेनेनं म्हटलंय.