कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ पिंपरी मध्ये

IMG-20221006-WA0076

कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ पिंपरी मध्ये

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे आयोजन

जन्मशताब्दी ग्रंथाचे १२ ऑकटोबर रोजी प्रकाशन

पुणे :

कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि सन्मान सोहळा पिंपरी मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे आयोजित करण्यात आला असून ‘बकुलगंध’ या जन्मशताब्दी ग्रंथाचे १२ ऑकटोबर रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम डी पी यु ऑडिटोरियम,डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज,संत तुकाराम नगर,पिंपरी येथे १२ ऑकटोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

सिक्कीम चे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस,संगीतकार अशोक पत्की,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. डॉ.डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असणार आहेत. पदमश्री गिरीश प्रभुणे,साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित,कवी रामदास फुटाणे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे,तसेच प्रमोद पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Latest News