धनुष्यबाण या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अधिकार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – धनुष्यबाण या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अधिकार होता, आहे आणि राहील.जरी दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या असतील आणि निकाल दिला नसेल. तरी आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरेंकडे चिन्ह राहील. न्यायालय त्यावर निकाल देईल. मात्र शिवसेनेची एक आचारसंहिता आहे. त्यालाही महत्व आहे. त्यामुळे धनुष्यबाण ठाकरेंकडेच राहील, असं अमोल मिटकरी म्हणालेत.सरकारचे 100 दिवस वाया गेले आहेत. नवरात्र, दहीहंडी, गरबा या धार्मिकतेतच नागरिकांना गुंतवून ठेवतायत. पण इथले रोजगार का गेले? इथल्या शेतकऱ्याला मदत का मदत मिळाली नाही?, असा सवाल त्यांनी केलाय.या सरकारच्या कार्यकाळावर शेतकरी नाखूश आहे. ज्या राज्यात शेतकरी नाखूश असेल किंवा उद्विग्न असेल तो राजा किंवा ते राज्य जास्त दिवस टिकत नसतं, असंही मिटकरी म्हणालेत.काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे, विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर देखील टीका केलीये.