लक्ष्मी पूजनाचे दिवशी गाड्यांची तोडफोड करून राडा करणाऱ्या गुन्हेगारांना अटक,क्राईम ब्रँचं युनिट एकची कारवाई

लक्ष्मी पूजनाचे दिवशी बुधवारपेठेत गाड्यांची तोडफोड करून राडा करणाऱ्या गुन्हेगारांना अटक,क्राईम ब्रँचं युनिट एकची कारवाई

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) दिवाळीच्या सना सुदीच्या काळात लक्ष्मी पूजनाचे दिवशी बुधवार पेठेत गाड्याची तोडफोड,नुकसान करून सामान्या नागरीकांना निर्दयतेने मारहाण करून गाड्याची तोडफोड करणारे,मोबाईल जबरीने लुटणारे चोरटे अखेर पुण्यातील क्राईम ब्रँचच्या युनिट एकने आरोपीना गाजआड केले

दुचाकी व चार चाकी गाड्यांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुस्कान करून सर्वसामान्य नागरीकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील मोबाईल जबरीने चोरून नेले,फरासखाना पोलीस ठाणे येथे दिनांक २५/१०/२०२२ रोजी गुन्हा रजि. नं २०३/२०२२ भादवि कलम ३९२.४२७,५०४, ५०६,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचे अनोळखी आरोपी गुन्हा करून फरार झाले होते.दि.३१ ऑक्टोबर ला युनिट एक गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना बातमी मिळाली की, ” लक्ष्मीपुजनाच्या दिवशी रात्रीचे वेळी बुधवारपेठ परिसरात जबरीने चोरलेले मोबाइल चोरणारे चोरटे त्यांचेकडील चोरीचे मोबाईल विक्रीसाठी राष्ट्रभुषण चौकीत येणार आहेत.गुन्हे शाखा, युनिट एक पुणे शहर पथकाकडील स्टाफसह एकुण चार आरोपीतांना ताब्यात घेतले त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांचेपैकी एक विधिसंपत बालक असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच ताब्यातील आरोपींची नामे १) अनुज जितेंद्र यादव वय १९ वर्ष रा घरकुल सोसायटी, लेन नं.३. ओम गंगोत्री सोसायटी, वडगावशेरी, पुणे क्र. २) दक्ष जुबेर गिलानी वय २० वर्ष रा गायत्री सदन, ३ रा मजला फ्लॉट नं १५, पोस्ट ऑफिसजवळ, वडगाव शेरी, पुणे. क्र. ३) राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा वय २३ वर्ष रा आनंदपार्क, वडगावशेरी, ओमकार हौसिंग सोसायटी, पुणे. अशी असल्याचे सांगीतले.

सदर आरोपींकडे कसून चौकशी करता त्यांनी लक्ष्मीपूजनाचे रात्रीचे वेळी बुधवारपेठत गाडयांची तोडफोड करून रोडवरती थांबलेल्या लोकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील मोबाईल लुटल्याची कबुली दिली आहें

दोन ओ पो कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट जप्त करून फरासखाना पो स्टे गुन्हा रजि नं २०३ /२०२२ भादवि कलम ३९२.४२७, ५०४, ५०६, ३४ हा गुन्हा उघडकीस आणला असून त्यांचेकडून जप्त करण्यात आलेल्या दुस या मोबाईलबाबत अधिक तपास चालू आहे. सदर आरोपी पैकी राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा याचे विरूध्द गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींना पुढील तपास व कार्यवाहीसाठी फरासखाना पो स्टे थे ताब्यात देण्यात आले आहे

.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे. श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हें १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले पोउप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, विठ्ठल साळुंखे, अभिनव लडकत, तुषार माळवदकर, निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांनी केली आहे.

Latest News