गुजर स्नेहवर्धिनी पुणे तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ८० बाटल्या रक्त संकलन”

“गुजर स्नेहवर्धिनी पुणे तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ८० बाटल्या रक्त संकलन”

पिंपरी, दि.13 नोव्हेंबर 2022 : गुजर स्नेहवर्धिनी पुणे यांच्यावतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ८० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. मोहननगर येथील मोरया ब्लड बँक यांच्या सहकार्याने शिवनगरी, बिजलीनगर येथील तुळजाभवानी मंदिर प्रांगणात रविवारी शिबिर घेण्यात आले.
यावेळी, गुजर स्नेहवर्धिनीचे अध्यक्ष अजय गुजर, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सदस्य प्रदीप पाटील, दीपक पाटील, प्रमोद चौधरी, जीवन चौधरी डॉ. सत्यजित पाटील, रुपेश पाटील व्यवस्थापक तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरास समाज बांधव व परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे रक्तदात्यात महिलांचा लाक्षणीय सहभाग घेतला.
सदर शिबिराचे संयोजन अमृत क्लिनिक डॉ. अनिकेत पाटील, प्रियांका पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी गुजर वस्तीगृहातील विद्यार्थी, परिसरातील कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. अध्यक्ष अजय गुजर यांनी सर्व रक्तदात्यांचे व तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापनाचे आभार मानले.

Latest News