पोलिस भरती मध्ये लैगिंकते वरुन केलेला भेदभाव, ट्रांसजेंडर ला संधी द्या मुख्यमंत्री शिंदे ना भावनिक निवेदन


पूणे पोलिस भर्ती महाराष्ट्र राज्य 2022 मधे लैगिंकते वरुन केलेला भेदभाव आणी पोलिस भरती मधे ट्रांसजेंडर ला संधी न दिल्या आम्ही शासनावर. नारज. आहोत तात्काळ ट्रांसजेंडर संधी. द्यावी अशी. भावनिक. साद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन घातली आहें
पोलीस भरती. मध्ये माझ नाव निकिता मूख्यदल असून मी ट्रांस महीला आहे पिंपरी चिंचवड महानगर पालिका मधे मी सूरक्षा विभागात सुरक्षा रक्षकाचा जाॅब करते. 2022 या वर्षी होणार्या पोलिस भरती मधे ट्रांसजेंडर आरक्षण राहील आणी आम्हाला सूद्धा माना सन्मान ने देशसेवा करता येईल अस वाटल होत.
पण आपण पोलिस भरती 2022 मधे आरक्षण तर सोडा साध ट्रांसजेंडर चा काॅलम ही ठेवला नाही तूम्ही आनाथांचा, भूकंपग्रस्ताचा सगळ्या चा विचार केला मग आमच्यावर अन्याय का? आम्ही महाराष्ट्र चे नागरिक नाही का, मतदान तर आम्ही पण करतो साहेब पोलिस भरती ची सर्व पूर्वतयारी असून सुद्धा तूम्ही संधी च दिली नाही तर आम्ही स्व ताला सिध्द करायच कस? आम्ही नोकरी करूच नये अस तूम्हाला वाटत का?
नोकरी करण्यासाठी लिंग महत्वाच आहे की काॅलिफिकेशन आणी टॅलेंट महत्वाच आहे. झारखंड मधे ट्रांसजेंडर पोलिस आहे कर्नाटक मधे आहे मग महाराष्ट्र त च का नको, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने तॄतीय पंथींयाना कामावर घेतल्याची बातमी जगभर पसरली असतांना, पोलिस भरती मधे ट्रांसजेंडर संधी देन महत्वपूर्ण वाटत नाहि का?
आम्ही भिकच मागायची का? आम्ही पात्र असतांना जर तूम्ही समान संधी देत नसाल तर कसा गर्व करू भारतात आणी महाराष्ट्र त जन्मल्याचा साहेब हात जोडून विंनती आहे पोलिस भरती 2022 मधे आमचा विचार केला जावा