संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय?

संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढयात भाग नव्हता त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले?, असा सवालच त्यांनी केला

पंतप्रधानांकडे भारतरत्न देण्याचे अधिकार असतात. मग गेली 8 वर्ष सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाशिम येथे भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेदरम्यान बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सावरकरांबाबत एक वक्तव्य केलं आहे. सावरकर इंग्रजांकडून पेंशन घेत होते, असं राहुल गांधी म्हणालेत. यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आता या प्रकरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Latest News