बेळगाव, कारवार, निपाणीसह आमची गावे, ती मिळवण्याचा प्रयत्न करणार…. देवेंद्र फडनविस


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – त्या योजनेलाही आपण लवकरच मान्यता देणार आहोत. होऊ शकते कोरोनामुळे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार त्याला मान्यता देऊ शकली नसेल. पण आता मात्र तेथे पाणी पोहोचणार आहे. या सर्व योजनांना केंद्र सरकारचा पैसा मिळाला असून पैशाची कुठलीही अडचण नाही. त्यामुळे २०१२मध्ये झालेल्या मागणी आता अधिक बोलण्याची गरज नाही. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलले, ते समजून घेण्याची गरज आहे. या सीमा वादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचे आपण ठरवले आहे. त्यांच्यासाठी आधीच्या आणि काही नवीन योजना आपण पोहोचवत आहोत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले, त्या जत तालुक्यातील गावांचा ठराव २०१२ मधील आहे. सीमा भागातले जे आपले लोक आहेत, त्यांना पूर्ण मदत करायची, असं आम्ही ठरवलं आहे. त्यांच्याकरता सध्याही काही योजना सुरू आहेत, पण आणखीही काही योजना सुरू करण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं असावं. पण महाराष्ट्रातलं एकही गाव कुठे जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेथे म्हणाले.या गावांनी सन २०१२ मध्ये ठराव केला होता. आता कोणीही ठराव केलेला नाही. आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी तेव्हा असा ठराव केला होता. मी मुख्यमंत्री (Chief Minister) असताना कर्नाटकसोबत बोलणी केली होती आणि जिथे पाणी उपलब्ध आहे, तेथून पाणी देण्याचा आपण निर्णय केला होता. म्हैसाळच्या सुधारित योजनेतही त्या गावांना घेण्याचा निर्णय तत्कालीन जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता, असेही यांनी सांगितलेनुकतीच राज्यपालांची बैठक झाली होती, त्याआधी दोन्ही राज्यांतील जलसंधारण मंत्र्यांचीही बैठक झाली होती. अशा बैठका झाल्याच पाहिजे. कारण आपण एकाच देशात राहतो हा एकआहे.