कर्नाटक आपल्याला बेळगाव, कारवार, निपाणी देणार नाही… नुसतंच द्या… असं म्हणल्यावर ते कसे देणार-शरद पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सीमा प्रश्न सोडवण्याचा भाजपतर्फे फक्त दिखावा सुरु आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत भाष्य केलं होतं. यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. यावर हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेत पवारांवर टीका केलीयेपवार यांच्या या वक्तव्यावरून आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा प्रश्नावर एवढा सोपा तोडगा आतापर्यंत का सापडला नाही, असा टोला त्यांनी लगावला. पवार यांचं अतिशय धक्कादायक आणि शोक व्यक्त करण्यासारखं हे वक्तव्य आहे, असं ते म्हणालेत.महाराष्ट्रातली काही गावं कर्नाटकला देणं हे तुमच्या जागावाटपाएवढं सोपं आहे का, असा सवाल आनंद दवे यांनी केलाय. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

मा प्रश्न सोडवण्याचा भाजपतर्फे फक्त दिखावा सुरु आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत भाष्य केलं होतं. यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. यावर हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेत पवारांवर टीका केलीये.आपण काहीतरी दिल्याशिवाय कर्नाटक आपल्याला बेळगाव, कारवार, निपाणी देणार नाही… नुसतंच द्या… असं म्हणल्यावर ते कसे देणार, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.दरम्यान, बेळगाव, निपाणी, कारवार आदी मराठी भाषिक गावांना महाराष्ट्रात विलीन करण्याचा अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे.

Latest News