पद्मश्री मालिनी अवस्थी यांचा लोकगीतांचा प्रभावी आविष्कार !

IMG-20221126-WA0458

*पद्मश्री मालिनी अवस्थी यांचा लोकगीतांचा प्रभावी आविष्कार !*…………

….डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रतिसाद

पुणे :हिंदी, भोजपुरी, अवधी भाषांमधील लोकगीतांवर प्रभुत्व असलेल्या पद्मश्री मालिनी अवस्थी यांच्या लोकगीत आविष्काराला डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सायंकाळी जोरदार दाद मिळाली. लोकगीते, ठुमरी,कजरी,सेहरा गीताला पुणेकरांनी टाळयांनी साथ दिली

.धर्म नाथ मिश्रा, सचिन कुमार, मुकेश मधुकर, अमित कुमार, धर्मेंद्र कुमार,तोहिन यांनी साथसंगत केली.आर जे तरूण यांनी सूत्रसंचालन केले. फेस्टिव्हलच्या मार्गदर्शक मोनिका सिंह यांनी मालिनी अवस्थी यांचा सत्कार केला.निर्गुण भजनाने मालिनी अवस्थी यांनी कार्यक्रमाला प्रारंभ केला

.’ अवध में जन्मे राम ‘, ‘निकला रे सैया अंगनवा पिछे ‘, ‘रेलिया बैरन ‘आदि लोकगीतांना चांगला प्रतिसाद मिळाला

.*’प्रिय भाई ‘ ला उदंड प्रतिसाद*पु.ल. देशपांडे , सुनीताबाई देशपांडे आणि कविता- काव्याच्या सहजीवनाचा हळवा प्रवास मांडणाऱ्या ‘प्रिय भाई , एक कविता हवी आहे ‘ या अभिवाचनाला ला उदंड प्रतिसाद मिळाला. कविता रुंपणार नाही,ती रूजत राहणार, असा संदेश या अभिवाचनाला झालेल्या हाऊसफुल्ल गर्दीने दिला. अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक अमित वझे आणि कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

*अभिनेते विक्रम गोखले यांना श्रध्दांजली*अभिनेते विक्रम गोखले यांना डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सायंकाळच्या सत्रात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी फेस्टिव्हलला सदिच्छा भेट दिली. सुरेशकुमार वैराळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व आवारात छोटेखानी गझल कार्यक्रम पडला.*

मुशायऱ्याचे उत्फुल्ल ‘रंग ‘*पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात ‘ रंग ‘ या मुशायऱ्याने मने जिंकली.वासिम बरेलवी, खुशबीर सिंह चौहान शाद, कुंवर रणजीत सिंह ,फरहत एहसास, राजेश रेड्डी,इरफान जाफरी, मोनिका सिंह, रजनीश गर्ग, वरूण आनंद सहभागी झाले…

Latest News