नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, 11 माळ्यांची इमारतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

नवीन इमारतीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार काही बदल करण्यात आले. आता ही इमारत ११ माळ्यांची असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या दोन्ही बाजूंनी दोन इमारती असतील. या इमारतीचा आराखडा व नकाशा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर करण्यात आला. त्यांनी इमारतीच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखविला.

आता पुढील प्रशासकीय कार्यवाही करून लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आहे

 जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ११ मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे सादरीकरण उपमुख्यमंत्री यांच्यासमक्ष करण्यात ले. त्यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे लवकरच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाचीपरिसरातच महसूल व इतर संबंधित सर्व विभाग आणण्यासाठी नवीन भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. शहर तहसील, सेतू, खनिकर्म तसेच उत्पादन शुल्क विभाग असलेली जुनी इमारत व संजय गांधी निराधार भवन तोडण्यात येणार आहे.

प्रथम तळमजला अधिक सहा (सात माळ्यांची) अशी इमारत तयार करण्याचे प्रस्तावित होते. बांधकाम विभागाने आराखडा तयार केला. मंत्रालयाकडूनयात त्रुटी काढून तो परत पाठविला होता. नंतर यात सुधारणा करण्यात आली. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर शासनानेया इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी मेट्रो रेल्वेकडे दिली.या इमारतीसाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०० कोटी देण्याची घोषणा २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इमारतीकडे लक्ष दिले असून, निधी वाढवून देण्यावरही सकारात्मता दर्शविली आहे. नवीन इमारतीवर अडीचशे कोटींचा खर्च येणार असल्याची सूत्रांकडून समजते. इमारतीसाठी निधीची कमी पडणार नाही; परंतु ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तयार करा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे समजते.

Latest News