राज्यपाल कोश्यारी आपल्या राज्यात परत जाणार, राजभवनकडून स्पष्टीकरण…..

मुंबई:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या राज्यात परत जाणार असून त्यांनी आपल्याला पदमुक्त करण्याबाबतचे संकेत दिल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबतची भावना त्यांनी निकटवर्तीयांकडे व्यक्त केल्याच्या चर्चा होती. मात्र, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून राजभवनाकडून या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता. आता तर महाविकास आघाडीसह सर्वच विरोधकांनी मोठी आघाडी उघडली आहे.

याचदरम्यान, राज्यपालांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा त्यांच्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केली असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.

त्यावर आता राजभवनकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून हे सर्व वृत्त तथ्यहीन असल्याचं सांगण्यात आले आहे

शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्ततव्यामुळे कोश्यारी चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांची राज्यपाल पदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीत देखील बोलावले होते. मात्र आजही कोश्यारींविरोधातील धार कमी झालेली नाही.महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 5 सप्टेंबर 2019 रोजी भगतसिंग कोश्यारी यांनी पदभार स्वीकारला होता. पण त्यांची ही कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली आहे.

आपल्या भूमिकांमुळे आणि वक्तव्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले

. खासदार उदयनराजे, संभाजीराजे यांच्यासह अनेक शिवप्रेमी संघटना राज्यपालांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. लवकरच ‘राज्यपाल हटाव’साठी महाराष्ट्र बंदची घोषणा होण्याची शक्यता आहेभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला हे वक्ततव्य, महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबाबतचं विधान, समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? वक्तव्य, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई-ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही यांसारखी वादग्रस्त विधानं कोश्यारी यांनी केले होती.आणि आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी महाराज तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील असे वादग्रस्त विधानांनी कोश्यारी कायम वाद अोढवून घेतला आहे.

Latest News