………………………….*संवादाशिवाय समता येणार नाही : प्रा.लिंबाळे*…………………*’मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ मराठी आवृत्तीचे प्रकाशन*
पुणे : ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ या इंग्रजी ग्रंथाच्या ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी केलेल्या भावानुवादाचे , परम मित्र पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेल्या ‘दलित इतिहासाचे आधुनिक शिल्पकार’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन भय्याजी जोशी (माजी सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांच्या हस्ते झाले
.मूळ इंग्रजी पुस्तक सुदर्शन रामबद्रन आणि डॉ. गुरु प्रकाश पासवान यांनी लिहिले असून पेंग्विन रँडम हाऊसतर्फे प्रकाशित झाले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे (संस्थापक अध्यक्ष, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज – डिक्की) हे होते.विशेष अतिथी म्हणून साहित्यिक शरणकुमार लिंबाळे , प्रा. अनिरुद्ध देशपांडे, सुदर्शन रामबद्रन,डॉ. गुरु प्रकाश पासवान प्रा. डॉ. उज्ज्वला हातागळे ( उपमुख्याध्यापिका,मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, पुणे ) हे उपस्थित होते.
*विषमता, भेदभाव संपले पाहिजेत. :भय्याजी जोशी*……………………..भैय्याजी जोशी म्हणाले, ‘या अनुवादित पुस्तकाच्या वाचनाने अंत : करणाची शोभा वाढली पाहिजे.जे हिंदू समाजजीवनाचे प्रश्न आहेत, ते एकत्रित पाहिले पाहिजेत. देशाबद्दल विचार केला पाहिजे. प्रश्नाला उत्तर शोधणारे उभे राहिले पाहिजे. प्रश्नांना घाबरू नये, ते सोडविणे ही आपली जबाबदारी आहे. ही १८ व्यक्तीमत्वे संवेदनशील व्यक्तीमत्वे आहेत. हे पुस्तक प्रातिनिधिक आहे. ते व्यापक झाले पाहिजे .प्रश्न सोडविण्याची प्रेरणा या व्यक्तीमत्वांकडे पाहून येते. एक निर्दोष समाज आवश्यक आहेत.विषमता, भेदभाव संपले पाहिजेत. आपण सर्व एक आहोत, सर्व हिंदू आहोत, असे म्हटले पाहिजेत. जात, प्रदेशानुसार पाहिले की आपण सव्वाशे कोटी राहत नाही, कमी होतो. वेगळेपणाचा भाव ठेवला की तो विकृत होतो, असे महापुरूषांनी सांगितले आहे.
*संवादाशिवाय समता येणार नाही : प्रा.लिंबाळे*प्रा.शरणकुमार लिंबाळे म्हणाले, ‘ दलित साहित्याच्या अनुवादकात , प्रकाशात ब्राहमण व्यक्तींची संख्या मोठी आहे. पुरोगामी हिंदू समाजाने आंदोलनातही मदत केलेली आहे. या सर्वांबद्दल कृतज्ञताच आहे. फुले, आंबेडकर चळवळीने हिंदू समाजाला नावेच ठेवली असा अपप्रचार केला जातो.
आम्ही हिंदू समाजातील विषमतेवर टीका करतो. कारण आम्ही त्या विषमतेचे बळी आहोत. आम्ही आणखी किती भांडायचे व्यवस्थेविरुध्द? हा देश महान व्हावा, हिंदू समाज प्रगत व्हावा, हीच आमची इच्छा आहे. दलित आणि संघ एकत्र आले पाहिजेत का ? आता संवाद झाला पाहिजे, त्याशिवाय समता नाही. हिंदू समाज बदलला पाहिजे. त्याचे मन बदलले पाहिजे.
आपल्याला लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. म्हणून संवाद आवश्यक आहे. हिंदू समाजाबद्दल आमचे लव्ह अॅण्ड हेट रिलेशन आहे. कारण आम्हाला इथेच या समाजाबरोबर राहायचे आहे. हिंदू धर्माचे बंडखोर म्हणून डॉ.आंबेडकर जगले. अन्याय होऊनही दलितांनी देशाविरुध्द काम केले नाही. दलितांनीही मूठभर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध बोलताना संपूर्ण हिंदू समाजाविरुद्ध बोलता कामा नये. वाईट हिंदूंना चांगल्या हिंदूंनी वेगळे पाडले पाहिजे. सरसंघचालक पापक्षालनाबद्दल बोलतात तेव्हा हिंदू समाज, संघ बदलू लागले आहेत, असे वाटते. आम्हाला इतिहास, परंपरेने नाकारले आहे, पण आता नवीन इतिहास लिहुया.एकमेकांना भेटत राहुया. ‘*समन्वयातून आर्थिक विकास शक्य:डॉ. मिलिंद कांबळे*..
………………….अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, ‘या पुस्तकातून चांगला आशय पुढे येत आहे. आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे, असे डॉ.आंबेडकर यांनी सांगीतले होते. पण, दलित समाजाच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न झाले नाहीत. समन्वयातून आर्थिक विकासाचा प्रयत्न ‘ डिकी ‘ मार्फत केला जात आहे.
‘दलित समाजातील झाकलेली रत्ने या पुस्तकात एकत्रित करण्यात आली आहेत,दलित समाजातील महामानवाना जयंती, पुण्यतिथीपुरते मर्यादित ठेऊ नये, त्यांचे विचार आचरणात आणावेत, या विचाराने हे पुस्तक लिहिले, असे मनोगत सुदर्शन रामबद्रन, डॉ. गुरूप्रकाश पासवान यांनी व्यक्त केले. सुधीर जोगळेकर म्हणाले, ‘
हजार वर्षातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्वांना या पुस्तकात एकत्र केली आहेत. हे दस्तावेजीकरण उपयुक्त ठरणार आहे ‘. डॉ. उज्ज्वला हातागळे म्हणाल्या, ‘ समाजाला सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या १८ व्यक्ति प्रेरक ठरत आहे ‘.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन कॉलेज, (स्वायत्त) पुणे आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) यांनी संयुक्तपणे हा प्रकाशन कार्यक्रम आयोजित केला
.डॉ. शरद कुंटे (अध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, गव्हर्निंग कौन्सिल ) आणि मुकुंद कमलाकर(अध्यक्ष, डिक्की, महाराष्ट्र) यांनी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रमेश पतंगे,डॉ. श्यामा घोणसे, माधव जोशी, अविनाश जगताप, राजीव साळवे, राहुल डंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. शरद कुंटे यांनी केले.सूत्रसंचालन सुनील भणगे यांनी केले. अविनाश जगताप यांनी आभार मानले…