डॉ.मोरेश्वर कोठावदे यांना राज्यस्तरीय म.फुले शिक्षक पुरस्कार प्रदान


डॉ.मोरेश्वर कोठावदे यांना राज्यस्तरीय म.फुले शिक्षक पुरस्कार प्रदान
पुणे :महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने डॉ.मोरेश्वर कोठावदे यांना उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल ‘महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

डॉ.कोठावदे हे ए.के.के.न्यू लॉ अकॅडमी(आझम कॅम्पस)येथे कार्यरत आहेत.२८ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकरी नेते राजू शेट्टी,डॉ.पी.ए.इनामदार,ज्ञानेश महाराव,श्रीमंत कोकाटे,राहुल पोकळे,डॉ.औदुंबर लोंढे,प्रा.सोमनाथ गोडसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देण्यात आले.यावेळी डॉ.सी.टी कुंजीर,डॉ.सारिका बहिरट आदी मान्यवर उपस्थित होते.