जोडे मारणे, पुतळे जाळणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, आपली संस्कृती नाही… खा गिरीश बापट


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
महाराष्ट्राला व देशाला ज्या पुणे शहराने सांस्कृतिक आणि राजकीय शिकवण दिली. त्याच पुण्यात आता असे प्रकार घडत आहे, याबाबत आता सर्वच पक्षांनी विचार केला पाहिजे. एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवणे, तो मुद्देसूद खोडून काढणे, आपली मतप्रदर्शन करणे, असे जे जे संसदीय मार्गात बसते, चौकटीत बसते, त्या कृती करण्यास काही हरकत नाही. मात्र बॅनर लावणे, जोडे मारणे, पुतळे जाळणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, ही आपली संस्कृती नाही, असे खडे बोलही बापटांनी सुनावले.
विकासासाठी, सर्वसामान्य माणसाचं हित यासाठी राजकारण केले गेले पाहिजे. मात्र आज हा हेतूच नष्ट होताना दिसत आहे. मागील काही दिवसात राजकारण गढूळ झाले आहे. राजकारण्यांनी पातळी, मर्यादा सोडून, वर्तन होताना दिसत आहे. अगदी पुणे शहरही याला अपवाद नाही. या परिस्थितीचा विचार सगळ्याच पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे, असे मत गिरीश बापट (Girish Bapat) यांनी व्यक्त केले