रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टच्या वतीने**ससून हॉस्पिटलला ५० लाखाची अद्ययावत उपकरणे प्रदान–‘सेव्ह द बेबीज’ उपक्रमांतर्गत पुढाकार


रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टच्या वतीने**ससून हॉस्पिटलला ५० लाखाची अद्ययावत उपकरणे प्रदान

अद्यावत शस्त्रक्रिया विभागाचे उदघाटन बी जे मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे,बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ दशमीत सिंग,अल्काईल अमाईन्स केमिकल्सचे उपाध्यक्ष श्री.अय्यर यांच्या हस्ते झाला.यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टचे पदाधिकारी उपस्थित होते.ही उपकरणे प्रदान करण्याचा कार्यक्रम २९ नोव्हेंबर रोजी झाला.
या अद्ययावत उपकरणांमध्ये सी आर्म ऑपरेशन टेबल,अनेस्थेशिया वर्कस्टेशन,पेडियाट्रिक सिस्टोस्कोपी युनिट,ब्लड वॉर्मर,पेशंट वॉर्मर,इलेक्ट्रो कॉटरी मशीन,वेसल सिलर आदींचा समावेश आहे.ससून मध्ये दरवर्षी सुमारे १५०० बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते,ही गरज पूर्ण करण्यासाठी या अद्ययावत उपकरणांची मदत होणार आहे.निवडक खासगी रुग्णालयांकडे असलेली ही उपकरणे या निमित्ताने ससूनमध्ये उपलब्ध झाली आहेत.