राणा दाम्पत्याविरूद्ध मुंबई सत्र न्यायालयाचे अटक वॉरंट


मुंबई:ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याविरूद्ध आता मुंबई सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर केलेल्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आंदोलानासंदर्भात न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे
काही महिन्यांपूर्वी जेव्हा राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करून जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या दरम्यान मोठा गदारोळ माजला होता. या प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात मुंबईच्या खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल आहे
. याआधी राणा दाम्पत्याला अटक होऊन जामीन सुद्धा मिळाला होता.अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा आता यांच्या अडचणी कमालीच्या वाढलेल्या दिसून येतात.
या खटल्याच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्याने हजर राहणं आवश्यक होतं. ११ नोव्हेबर रोजी या खटल्याची सुनावणी होती, मात्र या सुनावणीसाठी राणा दाम्पत्य हजर राहिले नाहीत, यानंतरही दोन सुनावणी दरणयान राणा दाम्पत्य गैरहजर राहिले होते. म्हणून न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे
आता पुढच्या सुनावणीाल न्यायालयापुढे हजर राहत, पाच हजार रूपयांच्या जामिनावर त्यांना आपली सुटका करून घेता येईल. मात्र या दरम्यान त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई होऊ शकते. यामुळे आता राणा दाम्पत्याची अडचण वाढलेली दिसून येते. पुढच्या सुनावणीसही गैरहजर राहिल्यास राणा दाम्पत्याला अटक ही अटळ आहे.