जगताप डेअरी चौकातील स्मार्ट टॉयलेटचे प्रशासक शेखर सिंह यांच्याहस्ते लोकार्पण* *स्मार्ट सिटीअंतर्गत पीपीपी तत्वावर राज्यातील पहिला उपक्रम;


*जगताप डेअरी चौकातील स्मार्ट टॉयलेटचे प्रशासक शेखर सिंह यांच्याहस्ते लोकार्पण* *स्मार्ट सिटीअंतर्गत पीपीपी तत्वावर राज्यातील पहिला उपक्रम;**इंटिग्रेटेड सिस्टीम आणि सेन्सर्स युक्त स्मार्ट टॉयलेटचा नागरिकांनी वापर करण्याचे आवाहन*
पिंपरी, ०२ डिसेंबर २०२२ : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत शहरातील नागरिकांसाठी जगताप डेअरी चौक परिसरात पीपीपी तत्वावर उभारण्यात आलेल्या स्मार्ट टॉयलेटचे (स्मार्ट सार्वजनिक शौचालय) पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
स्मार्ट सिटी मार्फत शहरामध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी १५ वर्षाच्या कालावधीकरीता पीपीपी तत्वावर (सार्वजनिक खाजगी भागीदारी) महिला व पुरुष असे स्वतंत्र कक्ष असलेले स्मार्ट सार्वजनिक शौचालय उभारण्यात येत आहे.
मेडिनीला हेल्थ केअर प्रा. लि. द्वारा संचलित २६ ठिकाणी ई-टॉयलेटचे काम सूरू आहे. जानेवारी २०२३ पर्यंत संपूर्ण ई-टॉयलेटचे काम पूर्ण करण्यात येणार आहेत. गुरुवारी सायंकाळी या उपक्रमातील जगताप डेअरी चौकातील पहिल्या स्मार्ट टॉयलेटचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमावेळी शहर अभियंता मकरंद निकम, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, महाव्यवस्थापक (इन्फ्रा.) मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे तसेच मेडिनीला हेल्थ केअर प्रा. लि. व सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरामध्ये स्मार्ट टॉयलेट ही संकल्पना राबविण्यात आली आहे. स्मार्ट टॉयलेट आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काम करणारी शौचालये आहेत. यामध्ये फ्लशिंग ऑपरेट करणे सोपे असून शौचालयाचा दरवाजा उघडल्याने टॉयलेट पॅन आपोआप फ्लश होते. बटण दाबल्यावर सहज फ्लशिंग सुनिश्चित करते.
टॉयलेट पॅनमध्ये एकत्रित केलेल्या प्रेशर नोजलद्वारे प्रेशराइज्ड फ्लशिंगची खात्री केली जाते. दरवाजा उघडल्यावर सेल्फ फ्लशिंग टॉयलेट, दहा वापरानंतर आपोआप फरशी साफ होते. यात अनेक अतिरिक्त इंटिग्रेटेड सिस्टीम आणि सेन्सर्स देखील समाविष्ट आहेत. राज्यातील हा पहिला उपक्रम असून जास्तीत जास्त नागरिकांनी स्मार्ट टॉयलेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.