समृध्दी महामार्गासोबतचं नागपूर मेट्रो रिच 2,3 च उद्घाटन सोहळा


नागपुर:(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा ११ डिसेंबरला होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.समृध्दी महामार्गासोबतचं नागपूर मेट्रो रिच २ आणि रिच ३ चा उद्घाटन सोहळा देखील पार पडणार आहे.
नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी करीत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्याचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे
राज्याचा कारभार हाचालवीत असल्याची टीका विरोधक करीत आहेत, विरोधक टीका करतानाच “सरकारचे स्टेअरिंग एकनाथ शिंदेंच्या नाही, तर ते आपल्याच हाती आहे, हे फडणवीसांनी दाखवून दिले आहे.नागपूर ते शिर्डी पर्यंतचा प्रवास आज ते करीत आहेत. सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे रवाना होणार आह
सध्या स्थितीत मुंबई ते नागपूर अंतर कापवयास जवळपास १४ तास लागतात. जवळपास ८१२ किमी हे अंतर आहे. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर ७०० किमी होईल व फक्त ८ तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. औरंगाबादहुन दोन्ही ठिकाणी जाण्यास केवळ ४ तास लागणार. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनूसार उभारण्यात येणार आहे. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एम.एस.आर.डि.सी काम पाहणार आहे.