राज्यपाल असो की राष्ट्रपती असो, मंत्रीपद खड्ड्यात गेलं, राज्यपालांना सोडणार नाही.- मंत्री गुलाबराव पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीयांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलल्या वादग्रस्त विधानावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.मंत्रीपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण, राज्यपालांना सोडणार नाही. राज्यपालांवर त्यांनी चांगलीच आगपाखड केलेली आहे.राज्यपाल असो की राष्ट्रपती असो, छत्रपती हे छत्रपती आहेत. तेच मोठे आहेत, अशा कडक शब्दात त्यांनी राज्यपालांना सुनावले आहेत

पाटील म्हणाले, शिवरायांच्याबाबतीत कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही . ज्यांना छत्रपतींबाबत माहिती आहे, त्यांनीच बोलावं. शिवरायांच्या बाबतीत कोणीही वाकडं तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांना माफ केलं जाणार नाही.शिवाजी महाराज हे देवाचे देव आहेत. ज्यांनी शिवचरित्र वाचलंय त्यांनी बोलावं.राज्यभरात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले.

राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला, असे असले तरी शिंदे गटाचे नेते व भाजप नेते राज्यपालांची बाजू सावरण्यासाठी पु्ढे सरसावलेले दिसून आले. मात्र आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर बरसून टीका केली आहे.एकीकडे भाजप आणि शिंदे गटातील नेते राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर सावधपणे भूमिका घेत असताना, गुलाबराव पाटील मात्र भलतेच आक्रमक झाले आहेत.

यामुळे शिंदे गटातील, काही थोडके नेतेच आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसतात. मात्र इतर नेते यांनी राज्यपालांवर मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Latest News