डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर’ या संस्थेची स्थापना :जयदेव गायकवाड

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर’ या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, तसेच त्यावर सुरू असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन अभ्यासाचे ग्रंथरूपात निर्मिती करण्याचा या मागचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष जयदेव गायकवाड आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाबासाहेबांच्या विचारांचा वेध घेत, देशातील विद्यमान राजकीय, सामाजिक परिस्थितीत नवे भान जागवण्यासाठी हे केंद्र कार्यरत राहील. या सेंटरच्या माध्यमातून विविध उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्याचा मानस आहे. तसेच जिल्हास्तरावर संविधान संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील घटनात्मक संस्थांची कोंडी सुरू झाली आहे.

या परिस्थितीत संविधानाची नैतिकता अधोरेखित करण्याचा केंद्राचा प्रयत्न राहणार आहे.’’डॉ. आंबेडकर यांच्या चरित्रपर ग्रंथांची माहिती करून देणे, त्यांच्या स्मरणार्थ समता व्याख्यानमाला आयोजित करणे, आंबेडकर विचारांचा ठसा असलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांना दरवर्षी १४ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान करणे, तज्ज्ञांना एकत्रित आणून मार्गदर्शन करणारा थिंक टँक उभा करणे, आदी विविध उद्दिष्टे केंद्राच्या वतीने पूर्ण करण्यात येतील.’’

Latest News