मनसेत मला टार्गेट केल जातयं…- वसंत मोरे

 पुणे:(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -सध्या पुणे शहर मनसेत ज्या पद्धतीने मला डावललं जातयं, मला टार्गेट केल जातयं, मला कार्यक्रमांना बोलवलं जात नाही, तरीही मी कार्यक्रमांना जातो, पण गेली तरी पटपट कार्यक्रम आवरला जातो. स्टेजवर स्थान दिलं तरी भाषण करु दिलं जात नाही. या सर्व गोष्टी मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगितलं आहे. अस मत माजी नगरसेवक वसंत मोरे यानी व्यक्त केले आहे

जेव्हापासून माझं शहराध्यक्ष पद गेलं तेव्हापासून कोअर कमिटीच्या कोणत्याही बैठकीला मी गेलेलो नाही. पण ज्या बैठका, मिटींग शहर कार्यालय सोडून दुसरीकडे होतात, त्याला मी कायम जात असतो.दादांनी मला ऑफर दिली तेव्हा तिथे राष्ट्रवादीचे इतर अनेक नगरसेवकही होते. त्यांच्यासमोर दादा माझ्याशी बोलले, त्यानंतर नगरसेवक विकास नाना दांगट पाटील, काका चव्हाण यांनीदेखील दादांच्या ऑफरचा विचार करण्याचा सल्ला दिला

, भविष्यात वसंत मोरे यांना आम्ही कुठे बघु, असं विचारलं असता ते म्हणाले की, सध्या तरी माझ्या छातीवर मनसेचा बॅच आहे. पण भविष्यातलं सांगू शकत नाही. असं सूचक वक्तव्यही त्यांनी केल आहे.

मी पक्ष आणि पक्ष नेतृत्तवावर नाराज नाही, पक्षाच्या कार्यकारिणीवर नाराज आहे. पक्षातील लोकांना, माझं काम करण, माझी सामान्य लोकांशी असलेली बॉंडिग ही या लोकांना बघवत नाही. पक्षात कोणी बोलायचं आणि काय बोलायचं हे देखील तेच ठरवायला लागलेच आणि मी मेंढरू नाही, मी कळपातला नाही, मी माझं अस्तित्व जपणारा वेगळा माणूस आहे. असंही यावेळी वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या भावाच्या मुलाच्या लग्न होत. आम्ही स्टेजच्या बाजुला उभे होतो. तितक्यात अजित पवार यांची एंट्री झाली. तिथे खुप गर्दी होती. गर्दीतही मी खुप मागे उभा होतो. पण त्या गर्दीतूनही अजितदादा दोन पावलं पुढे आले आणि त्यांनी माझ्या छातीवर थाप मारली. अरे तात्या किती नाराजी, या आता आमच्याकडे मी वाट बघतोय, असं म्हणाले.

त्यानंतरही योगायोगाने मी गेटवर एकटाच उभा होतो, परत एकदा अजित दादा त्याठिकाणी आले तेव्हा त्यांनी, वसंतराव मी वाट बघतोय, आपल्याला भेटायचं आहे. मी तिथेही दादांना होच बोललो. मला वाटतं हा मी केलेल्या कामाचा गौरव आहे, असं सूचक विधान वसंत मोरे यांनी केलं आहे.

दोन दिवसापूर्वी पुण्यातील एका विवाहसोहळ्यात वसंत मोरे यांना अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) येण्याची खुली ऑफर दिली. याबाबत विचारले असता वसंत मोरे यांनी पक्षातील कोअर कमिटीवर नाराजी व्यक्त केली आहे

, पण याच वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या ऑफरवरही सूचक वक्तव्य केलं आहे , मला कार्यक्रमांना बोलवलं जात नाही, पुण्याचे मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चां आहेत.

मध्यंतरी त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण त्यांनी प्रत्येक वेळी आपण मनसेतच असल्याचे सांगत सर्वं चर्चा धुडकावून लावल्या होत्या. असे असताना पुण्यातील एका विवाहसोहळ्यात विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: राष्ट्रवादीची ऑफर दिल्यानंतर पुन्हा एकदा शहरात अनेक तर्कवितर्क काढले जाऊ लागले.

Latest News