अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या घटनेनुसारच’:डॉ दिलीप गरुड,डॉ संगीता बर्वे यांचे स्पष्टीकरण

‘अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या घटनेनुसारच’:डॉ दिलीप गरुड,डॉ संगीता बर्वे यांचे स्पष्टीकरण

* —————————*मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत डॉ.गरुड,डॉ.बर्वे यांचा खुलासा*

पुणे :अ.भा.मराठी बालकुमार संस्थेच्या अध्यक्ष पद निवडीच्या प्रक्रियेबाबत संस्थेचे कार्यवाह डॉ.दिलीप गरुड आणि माजी अध्यक्ष डॉ.संगीता बर्वे यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे(प्रेस नोट) ही निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या घटनेनुसार पार पडल्याचे कळवले आहे.

डॉ दिलीप गरुड यांनी ६ मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले,’ निवडणूक प्रक्रिया कार्यवाहांच्या पत्रानुसार झाली. घटनेनुसारच झालेली आहे.नव्या अध्यक्षांची एकमताने निवड करण्यात आली.अर्ज भरण्याच्या तारखेबाबत चुकीची माहिती पुरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवला गेला. प्रक्रिया घटनेनुसार झालेली आहे

, प्रत्येक शाखांना प्रतिनिधित्व दिलेले आहे तरीही शाखांना प्रतिनिधित्व दिलेच नाही ,अशी माहिती पुरवून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला आहे.तसेच डॉ. संगीता बर्वे यांनी निवृत्तीची घोषणा केली नाही ,उलट त्यांची विश्वस्त पदी नियुक्ती झाली आहे. अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार संस्था ही मराठी मुलांसाठी महाराष्ट्र पातळीवर काम करणारी अग्रेसर संस्था आहे.

या संस्थेची सर्वसाधरण सभा व पंचवार्षिक निवडणुक घटनेनुसार झाली.सदर सभेमध्ये आपली मते मांड़ण्यास सर्वाना पुर्ण मुभा होती. परंतु सुनील महाजन व विजय शेंडगे या दोनच सभासदांनी अत्यंत अभिनिवेशाने व आक्रमकपणे त्यांची मते मांडून ज्येष्ठ असे निवडणूक अधिकारी व इतर सर्व उपस्थित सभासद यांचेवर अधिक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

बहुसंख्य सभासदांनी या अशोभनीय वर्तनाबद्दल खंत व्यक्त केली,असेही संस्थेमार्फत कार्यवाह डॉ.दिलीप गरुड यांनी म्हटले आहे. तर,’कवी राजन लाखे यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी दिल्याने त्यांचे नाव मी अध्यक्षपदासाठी सुचवले. त्यास सभेतील सर्व सभासदांनी एकमताने अनुमोदन दिले’,असे डॉ संगीता बर्वे यांनी कळवले आहे.

*डॉ गरुड म्हणतात* :———-कार्यवाहांच्या पत्रानुसार प्रक्रिया —————संस्थेचे तत्कालीन कार्यवाह हे तीन आठवड्यापासून गंभीर आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे निवडणूक पार पडेपर्यंत कोषाध्यक्ष यांनी काम पहावे असे पत्र संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे आणि निवडणूक अधिकारी ज. गं. फगरे यांनी तत्कालीन कोषाध्यक्ष दिलीप गरुड यांच्याकडे दिले होते.

असे असताना देखील साहित्याचा यत्किंचितही गंध नसलेल्या सुनील महाजन या सभासदास वारंवार सांगूनही त्यांनी या तांत्रिक मुद्द्यावर गोंधळ घातला. यावरून हा गोंधळ पूर्वनियोजित होता हे सिद्ध होते.निवडणूक प्रक्रिया ही घटनेनुसारच झालेली आहे

———————विरोध करणाऱ्यांमध्ये महाजन, विजय शेंडगे, ही दोनच मंडळी प्रामुख्याने होती. निवडणुकीत कार्यकारी मंडळासाठी अर्ज न केल्याने त्यांना संस्थेत कुठल्याही स्थान मिळणार नाही हे ते जाणून होते. या पराभवाच्या छायेखाली वावरताना आता आपल्या हातून संस्था जाण्याची खात्री झाल्याने सदर निवडणूक घटनाबाह्य आहे असे सभासदांना सभेत सांगून गदारोळ करण्याचा प्रयत्न केला आणि अनुभवी ज्येष्ठ निवडणूक अधिकारी यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.

नव्या अध्यक्षांची एकमताने निवड —————— नवनिर्वाचित अध्यक्ष कवी राजन लाखे यांच्या नावाची घोषणा ज. गं.फगरे यांनी केलेली नसून, त्यांनी कार्यकारी मंडळासाठी प्राप्त झालेल्या १२ अर्जापैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ११ जागांसाठी ११ अर्ज वैध असल्याचे सांगून, नवनिर्वाचित ११ विजयी झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली व आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

सदर प्रक्रियेनंतर यामध्ये निवडून आलेले राजन लाखे यांचे नाव डॉ. संगीता बर्वे यांनी अध्यक्षपदासाठी सुचवले. त्यास अनुमोदन म्हणून सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली ही वस्तुस्थिती आहे जी काही वृत्तपत्रात आली नाही.त्याचप्रमाणे लाखे यांच्या निवडीला एकाही सदस्याचा आक्षेप नसतानाही, सभासदांचा आक्षेप होता अशी चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलेली आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की लाखे यांच्या निवडीला उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिलेल्या क्षणी सभेत गोंधळ घालणारे, सुनील महाजन आणि विजय शेंडगे हे सभेत हजरच नव्हते. सभा संपण्याच्या अर्धा तासआधीच ते निघून गेले होते.

गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न ——————निवडणूक अधिका-याने २६-११-२०२२ च्या पत्रानुसार इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून २९ नोव्हेंबर ही अंतीम तारीख दिलेली होती.ही वस्तुस्थिती असताना ती माहिती देण्यात आली नाही आणि प्रक्रिया घटना बाह्य आहे अशी चुकीची माहिती पुरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवला.शाखांना प्रतिनिधित्व दिलेले आहे

— निवडणूक घटनेनुसार झालेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक शाखांना प्रतिनिधित्व दिलेले आहे त्यामुळे शाखांना प्रतिनिधित्व दिलेच नाही अशी माहिती पुरवून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. विश्वस्तपदी डॉ संगीता बर्वे—————– डॉ. संगीता बर्वे यांनी निवृत्तीची घोषणा केली अशी चुकीची माहिती काहींनी पुरवली आहे,

उलट सभेच्या शेवटी सर्व साधारण सभेच्या संमतीने बर्वे यांची विश्वस्तपदी नेमणूक करण्यात आली. ही वस्तुस्थिती काहींनी दिली नाही.–

———————————————————-*सदर खुलासा सविस्तर पणे देऊन लोकांमधील संभ्रम दूर करावा ही विनंती.* *डॉ. दिलीप गरूड* कार्यवाह अ.भा. मराठी बालकुमार संस्था पुणे—————————————————————–*डॉ. संगीता बर्वे* माजी अध्यक्षाअ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांचा खुलासा ……………………… वृत्तपत्रात आलेली अपुरी तसेच संभ्रम निर्माण करण्या-या बातमीबाबत माझा खुलासा *अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मी उमेदवारी दाखल केली नाही.

कारण अध्यक्षपदाचा पाच वर्षांचा माझा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.* *संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मी पूर्णवेळ उपस्थित होते.*

*निवडणूक निर्णय अधिकारी ज. गं फगरे यांनी कार्यकारी मंडळातील निवडून आलेल्या ११ कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये निवडून आलेले कवी राजन लाखे यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी दिल्याने त्यांचे नाव मी अध्यक्षपदासाठी सुचवले. त्यास सभेतील सर्व सभासदांनी एकमताने अनुमोदन दिले

Latest News