राऊत पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये: शंभूराज देसाई


मुंबई | ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – सरकारला जमत नसेल आणि मराठी भाषिकांवरील अन्याय वाढतच गेला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल, असा इशारा शरद पवार तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही दिला आहे. यावर आज शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली
. यावेळी बोलताना त्यांनी राऊतांवर सडकून टीका केलीयेमोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही राऊत यांची पद्धत बोलायची कुणीही सहन करणार नाही. संजय राऊत तोंड आवरा. साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत, असं शंभूराज देसाई म्हणालेत
.तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.बेळगाव सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या मंत्र्यांचा दोन वेळा ठरलेला दौरा आतापर्यंत रद्द करण्यात आला.