हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजप’ने राम मंदीरा साठी वर्गणी नव्हे तर भीक, खंडणी मागितली काय?- काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -सामाजिक क्रांतीचे प्रणेते, महापुरूष डॉ आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आदींनी शाळा – शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितल्याचे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले त्यावर राज्य काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजप’ने देखील राम मंदीरा साठी वर्गणी नव्हे तर भीक वा खंडणी मागितली काय(?) असा सवाल केला आहे .या विषयी प्रदेश काँग्रेस ने दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाजप ची नियत, निती व संस्कारां विषयी टिका करतांना सांगितले की, येन-केन प्रकारे महाराष्ट्राच्या अस्मिता व मानांकनां विषयी अवहेलना करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसुन येत आहे.
स्वातंत्र्योत्तर लोकशाही रूपी भारतास’ २१ व्या शतकाची दृष्टी देत सक्षम, शिक्षीत, स्वयंपुर्ण व प्रगतीशील बनवण्याकरीता पुर्वीच्या काँग्रेस सरकारांनी शिक्षणाचा व साक्षरतेचा प्रचार व प्रसार करीत शिक्षणाची कवाडे युवापिढी साठी खुली केली.मुलींना मोफत शिक्षण, गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी माफी साठी नादारी दिली.
पुढे जाऊन तत्कालीन युपीए अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसच्या पुढाकाराने ‘शिक्षण हक्क’ कायदा केला. पुरोगामी महाराष्ट्राचे नेते स्व वसंतदादा, विलासराव देशमुख, रामकृष्ण मोरे सर इ नी राज्यात शिक्षण प्रचार प्रसाराचा कृतीशील कार्यक्रम राबवला