लावणीसम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन


त्यांनी फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली. पण मराठी चित्रपटातील लावण्या त्यांची खरी ओळख ठरल्या. त्यासाठी ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला.ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला.