गोल्डन जंपस्टार्ट मेंटरशिप प्रॉग्राम ‘चे उद्घाटन!आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी व्ही.के. ग्रुपचा पुढाकार


*’गोल्डन जंपस्टार्ट मेंटरशिप प्रॉग्राम ‘चे उद्घाटन* ——————-*आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी व्ही.के. ग्रुपचा पुढाकार
*पुणे :आर्किटेक्चर क्षेत्रातील निगडित मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी,चर्चा करण्यासाठी ‘गोल्डन जंप स्टार्ट ‘ या उपक्रमाचे उद्घाटन १२ डिसेंबर रोजी सायंकाळी झाले.पहिल्या दिवशीच्या सत्रात व्ही.के. ग्रुपच्या संचालक अपूर्वा कुलकर्णी यांनी ‘ आर्किटेक्चर क्षेत्रातील कारकिर्दीची उभारणी ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम व्हि के ग्रुपच्या सेनापती बापट रस्त्यावरील मुख्यालयात झाला.अनघा परांजपे- पुरोहित यांनी प्रास्ताविक केले.शिवाली वायचळ, अमोल उंबरजे यांनी संयोजन केले. या मेंटरशिप प्रोग्रामसाठी ३० विद्यार्थी निवडण्यात आले आहेत.१३ डिसेंबर रोजी डिझाईन मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट ‘ या विषयावर ह्रषीकेश कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत,
१४ डिसेंबर रोजी द्वैपायन चक्रवर्ती ‘ प्रकल्प व्यवस्थापन ‘ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.१५ डिसेंबर रोजी ‘ प्लॅन सँक्शनिंग ‘ विषयावर ह्रषीकेश कुलकर्णी, ,१६ डिसेंबर रोजी पर्यावरणविषयक मुद्यांवर अनघा परांजपे -पुरोहित, डॉ.पूर्वा केसकर मार्गदर्शन करणार आहेत १७ डिसेंबर रोजी ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी , तसेच वरिष्ठ आर्किटेक्ट मंडळींशी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवा.निमित्त हे उपक्रम आयोजित करण्यात आली आहे