भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये ‘इंडो- साऊथ कोरिअन मीट ‘ उत्साहात

IMG-20221212-WA0292

प्भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये ‘इंडो- साऊथ कोरिअन मीट ‘ उत्साहात

पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रूनरशिप डेव्हलपमेंट( आयएमईडी ) येथे ‘इंडो- साऊथ कोरिअन मीट ‘ उत्साहात पार पडली. साऊथ कोरियातील उलसान शहर आणि पुणे शहरादरम्यान परस्पर शैक्षणिक तसेच तंत्रज्ञान विषयक सहकार्य वाढविण्याविषयी , शैक्षणिक आदान प्रदान विषयक, भारत- कोरिआ असोसिएशन स्थापनेविषयी, आयात- निर्यात प्रदर्शन आयोजना विषयी चर्चा झाली

.भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, दीपक नवलगुंद, डॉ. भारती जाधव यांनी स्वागत केले.के.के. उन( वार्टसिला कॉर्पोरेशन) ,जे.बी. सांग,जंगयांग आय.एम., जे.वाय. चॉय, प्रदीप तुपे(पुणे मॅनेजमेंट असोसिएशन), प्रशांत सौंद( (पुणे मॅनेजमेंट असोसिएशन ), प्रशांत जोगळेकर( मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे), संजय गांधी, राहुल जोशी, सुनेहा पाटील उपस्थित होते……

Latest News