छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भाजपतर्फे राज्यभर निषेध…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला. त्यांच्या वक्तव्याबद्दल भाजपतर्फे राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

सोमवारी धुळे शहरातही भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कडेलोट आंदोलनातून श्री. पवार यांचा निषेध केला. भाजपचे नगरसेवक हिरामण गवळी व कार्यकर्ते यशवंत येवले यांनी मावळ्यांचा वेश परिधान करून अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून कडेलोट केला.

महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक चंद्रकांत सोनार, मनपा स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले, चेतन मंडोरे, विनोद थोरात, बबन थोरात, नगरसेविका प्रतिभा चौधरी, ओम खंडेलवाल यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान श्री. पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.

पवार घराण्याने नेहमीच शिवाजी महाराजांचा द्वेष केला आहे. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांच्या निषेधासाठी महाविकास आघाडी पुढे येईल का, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काय भूमिका घेईल, असा सवालही भाजपने यानिमित्ताने केला.छत्रपती संभाजीराजे महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपतर्फे सोमवारी शहरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारयांचा कडेलोट आंदोलनातून निषेध केला.

शहरातील पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून श्री. पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर न संबोधता स्वराज्यरक्षक असे संबोधावे, असे विधान केले होते. त्यावर स्वागत व विरोध अशा विविध प्रतिक्रीया उमटल्या आहेत. भाजपने यासंदर्भात निषेध आंदोलन केले

Latest News