अंकोरवाट ‘ मंदिर समुहातून भारतीय कर्तृत्वाचे दर्शन : डॉ. देगलूरकर


‘अंकोरवाट ‘ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
………..
छंद वेध पुरस्काराने संग्राहकांचा सन्मान
……………
‘ अंकोरवाट ‘ मंदिर समुहातून भारतीय कर्तृत्वाचे दर्शन : डॉ. देगलूरकर
पुणे :
ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या ‘ अंकोरवाट ‘ या छायाचित्र प्रदर्शनाचे प्रदर्शनाचे उद्घाटन ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ.गो. बं.देगलूरकर यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनाचे आयोजन ६ ते ८ जानेवारी दरम्यान बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रोज सकाळी १० ते रात्री साडेआठ दरम्यान सुरू राहणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रात ‘संग्राहक श्री दिनकर(काका)केळकर छंदवेध पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आले. डॉ. आनंद केळकर, अजित गाडगीळ, डॉ. प्रकाश कामत, बापूजी ताम्हाणे, श्याम मोटे, विक्रम पेंडसे यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.डॉ. श्रीकांत केळकर, सौ. अरुणा केळकर यांनी स्वागत केले.
या प्रदर्शनात कंबोडिया, बाली, बोलोबुदुर,श्री लंका येथील प्राचीन बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या १०० फोटोंचा समावेश आहे. प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे ६,७,८ जानेवारी रोजी आहे. सकाळी १० ते रात्री ८.३० विनामूल्य खुले असणार आहे .
उद्घाटन प्रसंगी डॉ. गो.बं. देगलूरकर, डॉ. श्रीकांत केळकर,डॉ.मंजिरी भालेराव, सुरेश परदेशी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.केळकर यांचे हे सातवे प्रदर्शन होते.
डॉ. गो.बं.देगलूरकर म्हणाले, ‘अंकोरवाट ‘ मंदिर समुहाला कितीही वेळा भेट दिली तरी मन भरत नाही.आपल्या पूर्वजांनी तिकडे संस्कृती नेऊन दिली. त्यांची ही वास्तू निर्मिती अद्भूत होती. भारतीय संस्कृतीचा प्रसार त्यामुळे कंबोडिया येथे झाला.डॉ.केळकर यांनी मन लावून प्रकाशचित्रे घेतली आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन अतुलनीय झाले आहे.आपल्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी तिथे अंकोरवाट मंदिर समुहात आहेत. महाभारतातील प्रसंग आहेत. भारतीय कर्तृत्वाचं दर्शन या मंदिर समूहातून होते. ही सर्व सृष्टी या प्रदर्शनातून भेटीस आली आहे.
डॉ.मंजिरी भालेराव म्हणाल्या, ‘ छायाचित्रणासाठी निवडलेला विषयाचा आशय समर्थपणे या प्रदर्शनातून उमटला आहे. त्यासाठी डॉ.केळकर कौतुकास पात्र आहेत. ‘