बाळासाहेबांच्या शिवसेनेवर लोक विश्वास दाखवत आहेत :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकारवर स्थापन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर लोक विश्वास दाखवत आहे. शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, वाहतूक सेना, ग्राहक संघटना अशा विविध शाखांतील लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहे. यातून आम्ही जो काही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलातो योग्य होता, असा संदेश यातून मिळत आहे. ही एक चांगली सुरवात आहे.विविध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे, राजू आण्णा लवटे आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी कामाचा धडाका सुरु केलेला आहे. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होत आहेत

, असे शिंदे म्हणालेते पुढे म्हणाले, पाठींबा मिळण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातले सरकार उत्तम काम करीत आहे, याची पोचपावती आहे. आपल्या सरकारला सहा महिने झाले आहेत. या सहा महिन्यात विविध निर्णय झाले. ते शेतकरी, कामगार, कष्टकरी, वारकरी, शिक्षक, महिला आणि अडचणीत असलेल्या घटकांसाठी निर्णय झाले

.नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भ, मराठवाड्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय झाले. नुकसानग्रस्त धानासाठी 15 हजारांची भरपाई आपण जाहीर केली. खरे तर नागपुरला अधिवेशनच होत नव्हते. सरकार बदलले नसते तर अधिवेशनच झाले नसते, अशी स्थिती होती. कारण चीन, जपानमध्ये कोरोना सुरु झााल होता. आम्ही मात्र पुर्णकाळ अधिवेशन चालले. जे काही निर्णय झाले ते लोकांच्या हिताचे होते.शिंदे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. ते म्हणाले,

विरोधक बॅाम्ब फोडू, अमूक करू अशा वल्गना करीत होते. प्रत्यक्षात ते काहीच करू शकले नाही. खोदा पहाड मात्र चुहा भी नही निकला. फटाके, बाँम्ब सोडा, नागाची गोळीही पेटली नाही. वाजली नाही, कारण आम्ही काम करणारे लोक आहोत. मात्र असा काही आव आणला की सरकारने मोठा घोळ केलेला आहे.

जी माहिती विरोधकांनी घेतली ती व्यवस्थित घेतली असती तर बरे झाले असते. ते तोंडवर पडले नसते.गेले अडीच वर्षे जे बंद झाले होते, ते सर्व सुरु झालेले आहे. भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांचे सरकार उत्तम काम करते आहे.

आमचे जे आणदार आहेत, ते त्यांच्या मतदारसंघात लोकाभिमुख काम करीत आहेत. त्यामुळे लोक आमच्या पक्षात येत आहेत. त्याचीच ही पोचपावती आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जो निकाल लागला आहे तो पहा, म्हणजे तुम्हालाही त्याची कल्पना येईल. आमचे लोक खुप काम करतात, कमी सांगतात. इतर लोक थोड काम करतात, खुप मोठे काम केल्याचे दाखवतात.

Latest News