पिंपरी-चिंचवडमधील तरुणांचे थर्टी फर्स्टचे हटके सेलिब्रेशन !पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम

IMG-20230101-WA0568

पिंपरी-चिंचवडमधील तरुणांचे थर्टी फर्स्टचे हटके सेलिब्रेशन !पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम

 पिंपरी, प्रतिनिधी : ‘थँक्यू पोलीस काका ! दमले असाल, जरा मसाला दुध घ्या’, असे म्हणत पार्ट्या न करता पिंपरी चिंचवडमधील तरुणांनी थर्टी फर्स्टचे हटके सेलिब्रेशन केले.

       ‘दारू नको, दूध प्या’ असे आवाहन करीत पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नागरिकांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. रात्री फिरणाऱ्या पुरुषांना दारू पिण्याऐवजी एक ग्लास दूध घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

        दुधाचे वाटप पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंह, मन्ना सिंह, गौतम भगत, रहमान अली, सोनू सिंह, वसंत ढवळे, माँटी धारवाला, जतींदर सिंह आदींनी केले

. यावेळी स्थानिक पोलिसांनीही सहकार्य केले.          या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती देताना कमलजीत सिंह यांनी सांगितले, की लोक 31 डिसेंबर हा दिवस फक्त दारू पिण्यासाठी साजरा करतात. हा दिवस देशात मुख्यत्वे करून दारूबंदीचा दिवस म्हणून साजरा करणे आवश्यक आहे. कारण अनेक कुटुंबांना मद्यपानाच्या सवयीमुळे त्रास होतो.

लोकांच्या मद्यधुंद अवस्थेमुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला अपघात आणि अनुचित घटना घडतात. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या सवयीने व्हावी, यासाठी आम्ही त्यांना दारू पिण्याचे तोटे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. नवीन वर्षात दारू पिण्याऐवजी दूध पिऊन दिवसाची सुरुवात करावी, असे आवाहनही कमलजीत सिंह यांनी केले.

Latest News