पुण्याचा अभिजीत कटके ठरला महाराष्ट्र केसरी…

भारतीय कुस्ती महासंघाने दि.५ जानेवारी ते ८ जानेवारी या दरम्यान हैदराबाद आणि तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा ५-० असा पराभव केला.अभिजीत कटके याने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असून या पार्श्वभूमीवर पुण्यात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे

अभिजीत कटके याने या पूर्वी केसरी हा किताब पटकावलेला आहे. तसेच दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी हा ही किताब पटकावलेला आहे. त्यानंतर आता अभिजीतने हिंद केसरीची (Hindkesari) मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

त्यामुळे त्यांच महाराष्ट्रभर कौतुक करण्यात येत आहे.महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला आहे. अभिजीत कटके हा मुळचा पुण्याचा आहे. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटके याने खुल्या गटातून हा मान मिळवला आहे.

Latest News