चंदा कोचर, दीपक कोचर, कॅश फॉर लोन’ प्रकरणी सीबीआयची अटक बेकायदेशीर, सीबीआय कोर्टाकडून जामीन


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
‘कॅश फॉर लोन’ प्रकरणी कोचर दाम्पत्याला कोर्टाचा दिलासा आहे. मुंबई उच्चन्यायालाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. तसेच त्यांना मुंबई उच्च न्यायलायाने एक लाखाच्या जामिनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
२००९ आणि २०११ यादरम्यान व्हिडीओकॉन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांना कर्ज देतांना चंदा कोचर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप होता. वेणुगोपाल यांनी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेऊन मध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात चंदा कोचर यांना ईडीने २०२१मध्ये अटक केली होती.
कोचर दाम्पत्यासाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयला कोर्टाकडून त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.चंदा आणि दीपक कोचर यांना चंदा कोचर यांना भायखळा जिल्हा कारागृहात (महिला कारागृह) तर दीपक कोचर यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने शुक्रवारी या याचिकेवर निकाल राखून ठेवला होता. ही अटक सीआरपीसीच्या 41A च्या आदेशानुसार नाही, असे न्यायालयाने आदेश सुनावताना सांगितले.
या दोघांनी दोन वेगवेगळ्या याचिकाकर्त्यांद्वारे न्यायालयात अपील केली होती. 2009-2012 दरम्यान आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जांमधील अनियमिततांबाबत सीबीआयकडून एफआयआर रद्द करण्याची आणि अंतरिम सुटकेची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती
.वरिष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांनी चंदा कोचर यांची बाजू मांडली तर पतीतर्फे ज्येष्ठ अधिवक्ता विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली. कोचर सीआरपीसीच्या कलम 41A(3) चे पालन करून तपास यंत्रणेसमोर हजर झाले असल्याने त्यांना अटक करण्याची गरज नव्हती. असे वकिलांनी कोर्टाला सांगितले.